रविवार, डिसेंबर 10, 2023

अखेर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; दीड वर्षांनंतर जामीन मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. गिरीश चौधरी यांच्या जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. अखेर तो मजुंर झाला.

नेमकं प्रकरण काय?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला असा आरोप होता. या प्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर ७ जुलै २०२१ पासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत होते.. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधी देखील फेटाळण्यात आला होता. यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून याबाबत एका वाहिनीने वृत्त दिले आहे.