जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. यामुळे एकनाथ खडसे घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु असून यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचवल्या आहेत.

एकनाथ खडसे यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप ही केले होते. मात्र त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळाल्यानंतर ते पुन्हा भाजपच्या वाटेवर होते.
त्यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची देखील भेट घेऊन आपण लवकरच स्वगृही परतणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचा पक्षप्रवेश हा भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी न होऊ दिल्याचे वृत्त समोर आले होते.
भेटीमागचं कारण काय ?
आता अचानक त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मात्र ही भेट राष्ट्रीय महामार्गासाठी जागेच्या भुसंपादनाच्या संदर्भात घेतली असे समोर आले आहे. या दोघांमध्ये तब्बल 15 मिनिटे चर्चा झाली असून यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहे.