जळगाव जिल्हा

खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला : ईडीची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण खडसे मंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांनी आपल्या कुटुंबियांचा फायदा करून घेतला असून हा गैरव्यवहारच असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने कोर्टात केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थिती आरोपीला जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं.

कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पार्टीचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.

दरम्यान, भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती आणि जावई अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली असून जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर सौ. मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमिवर कोर्टात गिरीश चौधरी यांच्या जामीनावर झालेल्या सुनावणीत ईडीने दावा करत या भूखंडाच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button