⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! जळगावातील 12 बाजार समित्या आज राहणार बंद ; नेमकं कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | जळगाव जिल्ह्यातील बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व १२ बाजार समित्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्यस्थितीत रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये हरभरा, तूर, गहू, मका, ज्वारी, दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने कृषी व पणन कायद्यात बदल केले आहेत. या बदलाच्या विरोधात बाजार समिती सहकारी संघाने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कर्मचारी, हमाल-मापारी, व्यापारी देखील या आंदोलनात सहभाग घेत आहेत.