⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी पक्षात घेणे ही मोठी चूक… शरद पवारांची कबुली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठं मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. विशेष कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते असलेले एकनाथ खडसेंनी साडे तीन वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार असून याबाबत त्यांनी स्वत: माहिती देत आपल्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात घेणे, ही आपली मोठी चूक असल्याचे शरद पवार यांनी मान्य केल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. पुण्यातील बैठकीत शरद पवार यांनी चुकीची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणले डॉ. सतीश पाटील?
डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास आणि विधान परिषदेची उमेदवारी देण्यास जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. खडसेंना घेऊन पक्षाचा काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. खडसेंना आमदारकी देण्याऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना आमदार करावे, असेही म्हटले होते. 

परंतु त्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं. मात्र एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे केले. खडसे बाबत घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मोठी चूक होती, हे पवार साहेबांनी आता मान्य केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.

आता त्यांची सून रक्षा खडसे हिच्या उमेदवारीसाठी त्यांच्या आजारपणाचे खोटे कारण दिले आणि रावेर लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता भाजपात प्रवेश करणार आहे. हा प्रकार म्हणजे एकनाथ खडसे यांची खेळी होती, हे आता उघड झाले आहे, असे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे दिल्लीला का गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्या भेटी घेतल्या या सर्व बाबी आता समोर आल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली आहे, असा चिमटा डॉक्टर सतीश पाटील यांनी घेतला.