---Advertisement---
जळगाव जिल्हा

भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर नाथाभाऊंनी सोडलं मौन.. वाचा म्हणाले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 12 मार्च 2024 । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आज अखेर मौन सोडलं आहे. भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) यांच्या परवानगीची गरज नाही. मी लपून-छपून जाणार नाही. मात्र जेव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. असं एकनाथ खडसे म्हणाले.

eknath khadse 1 jpg webp

अलीकडेच लोकसभा तोंडावर आली असता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याच दरम्यान, मागील काही दिवसापासून एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत असल्याचं म्हणाले होते. मात्र भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय.

---Advertisement---

“भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन. पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन असं खडसे म्हणाले. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो. त्यामुळे यांच्यापेक्षा (मंत्री गिरीश महाजन) वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामाऱ्या केलेल्या नाहीत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“रक्षाताईने मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही. मला भाजपमध्ये यावं असं आवाहन करावं एवढी मोठी रक्षाताई अजून झालेली नाही. माझे सरळ नड्डाजी यांच्याशी संबंध आहेत. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांनासुद्धा ते माहीत आहे. शरद पवार यांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे त्यावेळी मी अंधारात होतो. मी आजपर्यंत शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट केलेली नाही. आता तरी सध्या माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही”, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---