⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | अखेर एकनाथ खडसे, गुलाबराव पाटलांमध्ये तडजोड, अब्रू नुकसानीचा खटला घेतला मागे

अखेर एकनाथ खडसे, गुलाबराव पाटलांमध्ये तडजोड, अब्रू नुकसानीचा खटला घेतला मागे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknatah Khadse) यांनी शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आज मंगळवारी जळगाव जिल्हा न्यायालयात या अब्रू नुकसानीच्या दाव्या संदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांना दिलासा मिळाला.

नेमकं प्रकरण काय?
2016 मध्ये एकनाथ खडसे हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, गेल्या आठवड्यात गुलाबराव पाटील गैरहजर राहिल्याने त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. दुसऱ्याच एकनाथ खडसे देखल गैरहजर राहिल्याने त्यांना देखील ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता.

दरम्यान, या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या गैरसमजतेतून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला असल्याची पहिली प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.