जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून याच दरम्यान, मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला त्यात राठवाड्यातील 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाच मुद्दा खडसे यांनी सभागृहात उपस्थित केला.
“मराठवाड्यातील 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून 500 रुपये महिना दिला जात आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्याबाबत माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत कृषीमंत्री यांनी छाननी करावी. तसेच याबाबत करवाई करावी. केंद्रेकर यांच म्हणणं आहे की, पेरणीच्या वेळीस शेतकऱ्याला रोख रक्कम देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे असं त्यांच्या अहवालात म्हटले आहे.” त्यामुळे निर्णय घेण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.