---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा बोदवड

शिक्षिकेचा विनयभंग, आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेतील ३७ वर्षीय शिक्षिकेच्या विनयभंग प्रकरणी शाळेतील आठ शिक्षक व शिक्षिकांविरुद्ध येथील पोलिसांत शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

crime

त्यानुसार १६ ऑक्टाेबर ते ४ जानेवारी २२ दरम्यान शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे नमूद केले आहे. शेख रफिक अहमद ताज, रा. जामनेर व उर्वरीत शिक्षक, शिक्षिकांनी आपली इतर खेड्यातील शाळेमध्ये बदली होण्याच्या दृष्टीने शेख रफिक यास वेळोवेळी मदत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून बदनामी करण्याची धमकी दिली. शेख रफिक याने फिर्यादीच्या इयत्ता चौथीच्या वर्गात ती एकटी बसलेली असताना तिचा विनयभंग केला. तसेच शिक्षिकेच्या पतीला पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आठ शिक्षक, शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात शेख रफीक अहमद ताज, रा.भोई नगर, जामनेर, शे. मोहम्मद इसहाक अब्दुलहक, रा.मलकापूर, समीना बेगम शे.बशीरा, रा.जाम मोहल्ला, भुसावळ, तरन्नुम जहा महंमद खा, रा.मोहम्मदी नगर, भुसावळ, नूरजहाँ बेगम मोहम्मद इस्हाकरा, रा.बिलाल मस्जिद जवळ, भुसावळ, मो. इरफान मो. इब्राहीमरा, रा.हिदायत नगर, बोदवड, ताजुन्निसा शे. कादरा, रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ व शाह रफिक अहमद फारूक शाह, रा. अकोला यांचा समावेश आहे.

---Advertisement---

दरम्यान या शिक्षिकेच्या विचित्र वागणुकीला कंटाळून शिक्षकांनी येथील पाेलिस ठाण्यात ६ रोजी गुन्हा दाखल केला. त्यावेळी शिक्षिकेच्या विचित्र वागणुकीचे पुरावेही सादर केले आहेत. त्यामुळे सूड बुद्धीच्या भावनेने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---