जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या प्रतिनिधिक मंडळाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी बैठकीचे आमंत्रण दिली असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दीपक सपकाळे यांनी दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि.२६ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी संवाद आयोजित केला होता. त्यावेळी यांच्याकडे विद्यार्थ्यांना समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने ३४ प्रश्न उपस्थित केले होते, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चर्चेसाठी वेळ देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उद्या दि. ४मे रोजी शिवालय,मुंबई येथे बैठकीकरिता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकारी यांना आमंत्रित केले आहे.
या बैठकीचे नेतृत्व मासुचे राज्य सचिव अरुण चव्हाण हे करणार असून त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन, शुभम गिते, जयेश चौधरी, पवन पाटील, भावेश पाटील तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी दिली आहे.