खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ ; गृहिणींच्या बजेटला फटका

जानेवारी 20, 2026 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२६ । घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

oil 2

सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. पामतेल १३२ वरून १३७, सूर्यफूल तेल १६० वरून १७२ रुपये प्रतिकिलो झाले आहे. तीळ तेल २६० रुपयांवर स्थिर आहे. साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. मात्र मागच्या काही दिवसात खाद्यतेलात वाढ झाली.

Advertisements

काय आहे दरवाढीचे कारण?
अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व अमेरिकन डॉलरच्या दरात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या कारणांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now