⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सर्वसामान्यांसाठी दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 50 ते 60 रुपयाने कमी, आता प्रति किलोचा दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२३ । कोरोना काळात महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली होती. यादरम्यान, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने किचन बजेट कोलमडून गेलं होते. मात्र त्यांनतर दिलासा. खाद्य तेलाच्या किमती जवळपास ५० ते ६० रुपयाने कमी झाल्या आहेत. यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे.

कोरोनानंतर जवळपास दोन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मागील एका महिन्यात सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाचे भाव घसरले आहेत. मात्र सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या किमती कमी झाल्या, तरी शेंगदाणा तेलाच्या किमतीत, पाहिजे त्या प्रमाणात घट झालेली नाही.

खाद्य तेलाच्या किंमतीत आज वर्षभराच्या तुलनेत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट आहे. यापूर्वी दीड वर्षांपूर्वी युक्रेन-रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत खाद्यतेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. मागील सहा महिन्यात सूर्यफूल आणि सोयाबीन तेलामध्ये ५० ते ६० रुपये किलोमागे घट झालेली आहे. मात्र त्या तुलनेत शेंगदाणा तेलाच्या किमती अजूनही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे जवळपास १० टक्के ग्राहक सूर्यफूल तेलाकडे वळले आहेत.

जळगावात प्रति किलो तेलाचा दर काय?
सध्या घाऊक बाजारपेठेत १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर १६५० ते १७०० रुपयापर्यंत विकला जात आले. तर होलसेलमध्ये सोयाबीन तेलाचे ९००MLचे पाऊच १०० ते १०५ रुपयांवर होते. तर खुले एक किलो सोयाबीन तेलाचा दर जवळपास ११५ ते १२० रुपये पर्यंत आहे. यापूर्वी सहा महिन्यापूर्वी तेलाचा एक किलोचा दर १४० रुपयांपर्यंत होता.