⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नागरिकांना दिलासा : खाद्यतेलाचे भाव घसरले

नागरिकांना दिलासा : खाद्यतेलाचे भाव घसरले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ ।  कोरोना काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. यात खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेटही कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली होती. मात्र, तेलातील ही भाववाढ या आठवड्यात थांबून प्रत्येक तेलामध्ये पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.

आधीच पेट्रोल, डीझेलसह गस सिलेंडरची दरवाढ कायम असतानाच दुसरीकडे खाद्य तेलाचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून महागाईचा फटका सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मात्र, या आठवड्यात हे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.

इतर किराणा मालाचे भाव स्थिर

डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहेत. मात्र, साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर, मेथी कडाडली

सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत. कोथिंबीर ८० रुपये किलो तर मेथीही ६० रुपये किलोवर आहे. टमाट्याचे भाव १५ रुपये प्रति किलोवर आहे.

हिरवी मिरची ‘तेज’

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मात्र, कोरोनामुळे लसूण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहेत. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरचीचा भाव ६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.