वाणिज्य

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ; खाद्यतेलाचे दर घसरले, वाचा आताचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून खाद्यतेलाचे दर घसरत असलयाने दिसून येत आहे. गेल्या तीन आठवड्यात सोयाबीन व सूर्यफूल तेल २० ते २५ रुपयांनी स्वस्त झाले असून यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. Edible oil prices fell

रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले होते. त्यातच इंडाेनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाची आयात बंद झाली होती. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले होते.त्यावेळी खाद्यतेल जवळपास १८० ते १९० रुपयांवर गेले होते. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले होते.

मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून तेलाच्या दरात घसरण झाली. आता पुन्हा सुमारे २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटवल्याने तेल आवाक्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी १५५ रुपये लिटरवर असलेले सोयाबीन तेल आता १३५, तर १८२ ते १८५ रुपयांवर असलेले सूर्यफूल तेल १६४ रुपयांवर घसरले आहे. शेंगदाणा तेल मात्र महिनाभरापासून १६२ ते १७० रुपये लिटरवर स्थिर आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहक शेंगदाणा तेलाएेवजी सोयाबीन व सूर्यफूल तेल खरेदीला प्राधान्य देतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button