⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात

रायसोनी महाविद्यालयात इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए विभागातर्फे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील कनिष्ट महाविद्यालयातील सभागृहात ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, बीसीए व एमसीए विभागाचे कौतुक अश्यासाठी कि त्यांनी या युवकांना पर्यावरणाचे धडे दिले. कारण भविष्यात त्यांच्याच खांद्यावर देश घडविण्याची जबाबदारी आहे. आणि अश्या कामात महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा हे अभिनंदनीय आहे.

त्यानी यावेळी उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राखण्याचे आवाहन करत युवकांचा या कार्यशाळेला मिळालेला उत्साह पाहून आनंद झाल्याचे सांगितले. प्रशिक्षक वैष्णवी पाटील यांनी अवघ्या दहा मिनिटांत शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या युवकांच्या चेहऱ्यावर होता.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वत: पर्यावरणपूरक गणपती तयार करून ते आपल्या घरी स्थापन करावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेची संकल्पना बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांची होती तर कार्यशाळेच्या समन्वयिका प्रा. रुपाली ढाके या होत्या तसेच या कार्यशाळेसाठी एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा. सरिता चरखा यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह