⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ टीकेवर भाजप जिल्हाध्यक्षांचं सणसणीत उत्तर ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्रही विचारत नव्हतं, त्यावेळी मी राजकारणात भाजपला जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलं होते. आता खडसेंच्या या टीकेवर भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

काय म्हणाले जळकेकर?
ज्या भाजप विषयी तुम्ही बोलतात त्याच भाजपने तुम्हाला बारा खात्याचे मंत्री केलं, विरोधी पक्ष नेतेपद दिले. भाजपने तुमच्या मुलीला जिल्हा बँकेचा अध्यक्षपद दिले. भाजपनेच तुमच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष पद दिले. एवढा असतानाही तुम्ही भाजपला कुत्रही विचारात नव्हता, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे. या शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसेवर निशाणा साधला आहे.

बेताल वक्तव्यासाठी एकनाथ खडसे सध्या प्रसिद्ध आहेत. यापुढे बोलताना वयाचे भान ठेवून वक्तव्य करा, असा टोला सुद्धा भाजप जिल्हाध्यक्ष यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. भाजप सोडल्यानंतर तुमचीच परिस्थिती तुम्ही जसं बोलले कुत्र विचारत नाही, त्याप्रमाणे झाली आहे, असे ज्ञानेश्वर जळकेकर यांनी म्हटले आहे.