गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव-पाचोरा रोडवर भरधाव डंपर खासगी बसला धडकले; अनेक प्रवाशी जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदा गावाजवळील वळणावर लक्झरी बस व डंपर यांचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील जवळपास २५ प्रवाशांसह दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले आहेत. जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, प्रवाशी घेऊन साईनाथ ट्रॅव्हल्स (क्र.एमएच १९ वाय ३३५९) पाचोराहुन जळगावकडे येत होती. तर कडीचा कच भरुन डंपर वावडदाकडून वडलीकडे भरधाव वेगाने जात असताना वळणावर डंपरने (एम.एच.१९ सी.एक्स २५७७) बसला जोरदार धडक दिली.त्यात बस एका दिशेने चक्काचूर झाली. तर डंपरही चालकाच्या दिशेन चक्काचूर झाला.

यात बसमधील २५ प्रवाशांसह चालक व क्लिनर जखमी झाला तर डंपरचा चालकही जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच वडली व वावडदा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिका तसेच मिळेल त्या वाहनाने सरकारी व खासगी रुग्णालयात रवाना केले. यातील २५ जणांवर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

अपघातातील जखमींचे नावे?
सरुबाई विठ्ठल केळकर (वय ६०,रा.पाथरी, ता.जळगाव), संदीप सुधाकर सोनगे (वय २०,रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८), रंजना पुना पाटील (वय ४५), आशा अशोक पाटील (वय ४०), आक्का वसंत पाटील (वय ५०), मनिषा विनोद पाटील (वय ३८), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५), संजय महाजन (वय ५०), वैभवी दादाभाऊ पवार (वय १६) सर्व रा.नांद्रा. ता.पाचोरा), सराबाई विठ्ठल देवकर (वय ६५, रा.वावडदा), इंदूबाई बिरबल राठोड (वय ३६) करण बिरबल राठोड (वय १८, रा.धानवड, ता.जळगाव), अंजना श्रीकृष्ण माळी वय ४५),श्रीकृष्ण माळी (वय ५३ कुऱ्हाड, ता.पाचोरा), नितीन सुभाष पाटील (वय ३५,रा.वडली,) अशोक महारु राठोड (वय ३२), सिंधूबाई पाटील (वय ६५), प्रकाश वसंत बोरसे (वय ५६), रवींद्र अर्जुनसिंग राजपूत (वय ५५), शिवनंदन शालिक पवार (वय ३०), प्रतिक संजय खेडकर (वय ३६), पुजा कैलास पाटील (वय ३८)व वंदना सूर्यकांत धनगर (वय ४०)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button