---Advertisement---
मुक्ताईनगर

भरधाव डंपरची एसटी बसला धडक, अनेक प्रवाशी जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशातच भरधाव वेगात असलेल्या डंपरने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या जवळ घडली आहे. या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

muktainagar accident jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या पुढे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने बसला धडक दिली. यात एमएच१९ सीवाय ५२७२ क्रमांकाच्या डंपने एमएच १३ सीयू ६९३१ क्रमांकाच्या बसला धडक दिली. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बसचे चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख ( रा. वरणगाव ) तसेच वाहक (कंडक्टर) प्रितीमा शांताराम अहिरे ( रा. भुसावळ) यांच्यासह सुनील बाबूराव काजनेकर (उमापूर); बाबूराव दामोदर ठोसर व यमुनाबाई बाबूराव ठोसर ( रा. चिंचखेडा बुद्रुक ); गणेश रामकृष्ण कोळी (रा. पारंबी): इस्माईल खॉ इम्रान खॉ; सुधाकर नारायण अहुळकार ( रा. पारंबी ); निवृत्ती सापुर्डा ढोण; व शुभांगी तुषार अहुळकार यांचा समावेश आहे.

---Advertisement---

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---