⁠ 
शनिवार, जून 22, 2024

वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाचा केळी बागांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यातच शनिवारी (दि २५) सायंकाळी जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. मात्र या वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळी बागा उद्धवस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले.

काही दिवसापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या.अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक अक्षरश: निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस झाला.

या वादळात हजारो हेक्टर जमीनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या जोरदार वादामुळे काही ठिकाणी घरावरील पत्र उडाले. दरम्यान, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांनी भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.