---Advertisement---
महाराष्ट्र

राज्य सरकारने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 387 कोटींची मदत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

bus 3 jpg webp

दिवाळी आली की अनेकवेळा एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी कामबंद आंदोलन करण्याची वेळ येत होती. मात्र, या वर्षी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं ‘गिफ्ट’ दिलं आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला मोठी मदत करणार असल्यामुळे पुढील काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.

---Advertisement---

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जवळपास 80 हजारांपेक्षा जास्त आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आशा स्वयंसेविकांच्या मानधनामध्ये 6,200 रुपयांची मानधन वाढ तर प्रत्येकी दोन हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे.

गट प्रवर्तकांनाही मानधन वाढ
महाराष्ट्रात जवळपास 3,664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येते. आता राज्य सरकारने 6,200 रुपयांची मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गट प्रवर्तकांना केंद्र सरकारही 8,775 रुपये मानधन देते. त्यामुळे यापुढे आता गट प्रवर्तकांना 21,175 रुपये एवढे एकत्रित मानधन मिळणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---