सलग पाच दिवस अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान !

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ ।  जिल्ह्यात झालेल्या अवकाळीमुळे नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना हा अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे.

avakali अवकाळी rain jpg webp webp

जामनेर तालुक्यातील पहूर तालुक्यात सलग पाचव्या दिवशी गारपीट सह परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यात वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. वार्‍यामुळे विज खांब वाकले असून वीजतारा लोमकळलेल्या स्थितीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

कापून ठेवलेला मका आणि ज्वारी असाच पाऊस काही दिवस राहिल्यास कणसावरच उगवून येते की काय ? अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now