---Advertisement---
हवामान

पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, नाशिकमध्ये दुष्काळी स्थिती

duskal
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ ।  महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, नाशिकमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

duskal

राज्यात मान्सून दाखल झाला. सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आणि बळीराजा पेरणीच्या कामाला लागला. कुणी उसनवारी करुन, तर कुणी कर्ज काढून  बियाणं आणलं आणि पेरणीचं सौंग साजरं केले. पण जुलै उजाडला तरी देखील पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. त्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, नाशिकमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कालपासून राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. 

---Advertisement---

नाशिकमध्ये मागील १५ ते २० दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोटात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कालही पावसाळी वातावरण होते. परंतु पावसाचे आगमन झालेच नाही.  त्यामुळे धरणातील पाणी पातळी घटू लागल्याने पाणी कपातीचे संकट आले आहे. यामुळे नाशिक करांवर देखील पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे. सोबतच पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आले. 

तर धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकेत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या खंडानंतर काल शुक्रवारी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे शेती पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु जिल्ह्यात अद्यापही पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरीसह सर्वसामान्य मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात 12 तारखेपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने ओढ दिली असून जिल्ह्यातील पावसाची तुट १२ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. जिल्ह्यातील काही भागा तर पिकांनी आता माना टाकल्याचे एकंदरती चित्र आहे. त्यामुळे आता जर पावसाने आणखी अेाढ दिली तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---