Yawal : ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला अन्.. चालक जागीच ठार, क्लिनर जखमी

फेब्रुवारी 20, 2025 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सावखेडासिम (ता.यावल) येथून चोपड्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पुलावरून थेट नदीपात्रात कोसळले. ही घटना वाघोदा गावाजवळ नदीच्या पुलावर घडली असून या दुर्घटनेत ३२ वर्षीय चालक जागीच ठार, तर २० वर्षीय क्लिनर जखमी झाला. राकेश जयराम बारेला (वय ३२, रा. छोटी शिरवेल, ता. सेंधवा, जि.बडवाणी) असं या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

vaghod

या घटनेबाबत असे की, एमएच .१९ – सीव्ही. ११२४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून त्यातून उसाची वाहतूक सुरू होती. हे ट्रॅक्टर घेऊन चालक राकेश बारेला हा क्लिनर राधेश्याम गंभीर बारेला (वय २०, रा. बोरअजंटी ता. चोपडा) सोबत चोपड्याकडे जात होता. मंगळवारी मध्यरात्री तो यावलकडून चोपड्याला जात असताना वाघोदा गावाजवळ नदीच्या पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. यानंतर काही क्षणात ते पुलावरून खाली नदीत कोसळले.

Advertisements

या अपघातामध्ये राकेश बारेला हा जागीच ठार झाला. तर राधेश्याम बारेला हा जखमी झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.सहर हमदुल्ले यांनी राधेश्यामवर प्रथमोपचार केले. पण, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथे हलवण्यात आले. अपघात प्रकरणी दिनकर महाजन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक राकेश बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now