⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

Drishyam 2: ‘दृश्यम 2’ ने पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । अभिनेता अजय देवगनचा बहुप्रतिक्षेत असलेला ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा चित्रपट काल (18 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘दृश्यम 2’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘दृश्यम 2’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली आहे. दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. रिपोर्टनुसार, जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

कलाकारांचे मानधन
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे.