---Advertisement---
एरंडोल पारोळा भडगाव

एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील १३७, पारोळा तालुक्यातील १२३ तर भडगाव तालुक्यातील ३० अशा एकुण २९० मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत प्रारूप मतदार याद्या सोमवार दि.१ रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. दरम्यान, या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर दि.१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत.

Voter List jpg webp

एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यातील २९० मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार याद्या सोमवार दि.१ रोजी प्रसिध्द करण्यात आल्या असून या मतदार याद्यांवर दि.१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच दि.१३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी दि.२० डिसेंबरपर्यंत असणार आहे. दि.५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

---Advertisement---

ग्रामसभेत याद्यांचे वाचन करण्याच्या सूचना
प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात व्हावी म्हणून ग्रामसेभेचे आयोजन करण्यात यावे, या ग्रामसभेत मतदार याद्यांचे वाचन करुन एकाच व्यक्तीचे दोनदा आलेले नाव, मृत व्यक्ती, गाव सोडून गेलेली व्यक्ती किंवा अन्य मतदारयादीत नाव असलेली, अशी सर्व नावे ग्रामसेवक यांनी पुरावे घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने कमी करावीत अशा सूचना एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी व तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, जनतेने याची दखल घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---