डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात सावित्रीबाई फुलेना अभिवादन

जानेवारी 3, 2026 4:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. ही जयंती दरवर्षी ३ जानेवारी रोजी साजरी केली जाते, कारण या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता.

Dr. Varsha Patil College savitribai

सुरूवातीला प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यांनी सांगितले की सामाज बदलण्यासाठी शिक्षण हेच मुख्य साधन आहे, आणि यासाठी सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला. त्या महिलांसाठी शिक्षण आणि समानतेच्या हक्कासाठी प्रबोधन करत समाजाच्या विरोधाला धैर्याने सामोरं गेल्या.

Advertisements

सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला, असमानतेविरुद्ध आवाज उठवला आणि अंधश्रद्धा, समाजातील अन्याय यांना विरोध केला. त्यांच्या कार्यामुळे आजही अनेकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मानसी अहिरे यांनी केले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now