जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । मंगळवार दि. १३ मे ला १० वी १२वी सीबीएसईचा निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,भुसावळने घवघवीत यश मिळालेले आहे.

१० वीचा निकाल
धु्रव सुनिल अहिरराव ९७% मिळवत प्रथम, भावी हेमंत इंगळे ९६.८०% व्दीतीय, स्नेहल जोशी ९४.८०% तृतीय, खुशी तायडे ९४.६०% चौथी,रूतूजा पाटील ९४.४०% पाचवी आणि हर्षल पाटील ९४.२०% सहावा,समृध्दी तायडे ९३.४० % सातवी,अदिश्री सोनकुसारे ९३.२०% आठवी,आदित्यकुमार सुमन ९३.२०% नववा,अभिषेक भोलाणे ९२.८०% दहावा, धु्रव गणितात १०० पैकी १०० मार्कस तर आयटीमध्ये भावी इंगळे,हर्षल पाटील आणि अदिश्री सोनकुसारे यांना १०० पैकी १०० मार्कस मिळाले आहे.
१२ वीचा निकाल
इयत्ता बारावी मध्ये ओजस्वीत सायवान ९४.४०% प्रथम अमीत अहिरराव ९४.४०% व्दीतीय तर प्रणीता पैकराव ९४.२०% गुण प्राप्त करत तृतीय, इशांत यादव ९०.४० आणि आदीत्य तोताणी ८९ टक्के मिळवत पाचवा आलेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फौंडेशनचे सदस्य डॉ.केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.