गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

फेब्रुवारी 16, 2026 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोदावरी संस्थेतील विविध परिसंस्थांमधील कर्मचार्‍यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा विजेता ठरला.

GPPL

यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष होते. एकूण १६ सामने अत्यंत उत्साहात पार पडले, त्यात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव, गोदावरी अ‍ॅग्री कॉलेज, गोदावरी लॉ कॉलेज, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, डॉ. वर्षा पाटील बीसीए या संघांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत सेमी फायनल डॉ. वर्षा पाटील बीसीए आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल यांच्यात झाला, तर दुसरा सेमी फायनल डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा विरुद्ध गोदावरी सीबीएससी जळगाव यांच्यात झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now