जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकतेच जाहीर झालेल्या फिजिओथेरपी पदवी परीक्षेत डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीने यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा हिवाळी व्दीतीय वर्ष निकाल तब्बल ८७% लागला असून, खुशी विजय मुंदडा ७५.२% गुण मिळवून प्रथम,अनं विच्य ७०.८५% गुणांसह द्वितीय,तर दिया संदीप धांडे ७०.% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तर तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून महेक करडा ७३.८% गुण मिळवून प्रथम,सुमेधा भावसार ७१% गुणांसह द्वितीय तर मधीहा बर्हनी ७०.% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.या शानदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव वर्षा पाटील,संचालक डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रा. डॉ. जयवंत नगूलकर, प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरीआणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमासोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि संस्थेच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले, असे संस्थेने म्हटले आहे.