---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

रावेर लोकसभा मतदार संघाबाबत काँग्रेस नेते डॉ.देशमुख यांच्यासोबत डॉ.उल्हास पाटलांची चर्चा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ ऑगस्ट २०२३ | अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी बुधवारी सकाळी ११ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पुष्पगुछ, शाल, श्रीफळ देऊन डॉ. देशमुख यांचे स्वागत केले. या भेटीत आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुका आणि काँग्रेसचे पक्ष संघटन यावर डॉ. सुनील देशमुख आणि डॉ.उल्हास पाटील यांच्यात चर्चा झाली.

ulhas patil 2 jpg webp webp

डॉ. देशमुख यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकिय परीस्थितीची माहिती डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून जाणून घेतली. तसेच डॉ. देशमुख यांनी वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयाची माहिती जाणून घेतली. तसेच माजी जि. प गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनीही यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आणि मलकापुर अशा सहा विधानसभा मतदारसंघातील राजकिय परीस्थितीची माहिती डॉ. देशमुख व पदाधिकार्‍यांना दिली.

---Advertisement---

याप्रसंगी मलकापुरचे आमदार राजेश एकडे, लोकसभा समन्वयक दीप चव्हाण, मलकापुरचे माजी नगराध्यक्ष डॉ अरविंद कोलते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदिप पाटील, जिल्हा परीषदेचे माजी गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, अल्पसंख्याक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मुनावर खान, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजय मंगले आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---