⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

भुसावळच्या डॉ.संगीता बियाणी विशेष पुरस्काराने सन्मानीत

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने भुसावळच्या माजी नगरसेविका व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता मनोज बियाणी यांना शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल शनिवार ‘सुयोग 2022’ हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय अध्यक्ष श्याम सोनी, अखिल भारतीय महामंत्री संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिशन भनसाली, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा अनुसया मालू उपस्थित होते.

2019-2022 या वर्षात महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात आलेल्या शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पुरस्कार त्यांना अखिल भारतीय अध्यक्ष श्याम सोनी, अखिल भारतीय महामंत्री संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिशन भनसाली, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा अनुसया मालू, शैलजा मंत्री, श्यामसुंदर मंद्यानीया, माजी प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी, सतीश चरखा, स्वागत अध्यक्ष भिकूलाल मर्दा, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मंत्री, महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन अध्यक्ष हार्दिक सारडा या मान्यवरांच्या हस्ते डॉ.संगीता मनोज बियाणी यांना पुरस्कार देण्यात आला त्यात प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

भुसावळसारख्या छोट्या शहरात राहूनही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले व डॉ.संगीता बियाणी यांनी त्यांच्या कार्याचा झेंडा फडकवला आहे.पुरस्कार स्विकारतांना त्यांच्या सोबत त्यांचे पती उद्योगपती मनोज बन्सीलाल बियाणी, ओमप्रकाश भांगडिया, सरस्वती भांगडिया, उमेश भांगडिया सह परीवारातील सदस्य उपस्थित होते.