---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

डॉ.राधेश्याम चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे की ‘जळगाव फर्स्ट’चे? – सुनील महाजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस तथा जळगाव फर्स्ट चे समन्वयक डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी डॉ.राधेश्याम चौधरी हे नक्की भारतीय जनता पक्षाचे आहेत की ‘जळगाव फर्स्ट’चे? असा प्रश्न सुनील महाजन यांनी विचारला (Radheshyam Chaudhary and Sunil Mahajan)

radheshyam chaudharu and sunil mahajan jpg webp webp

काव्यरत्नावली चौक ते डी मार्ट हा जळगाव शहराचा राजमार्ग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उच्चवर्गीय नागरिक राहतात. अशावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी महापौरांनी या ठिकाणी काँक्रीटीकर्णाची मागणी केली आहे. त्यासाठी निधी मागितला आहे. यामुळे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी संपूर्ण माहिती घ्यावी याचबरोबर समाजकारणाच्या आडून राजकारण करण्याची गरज राधेश्याम चौधरी यांना नाही. राधेश्याम चौधरी भारतीय जनता पक्षात आहेत की जळगाव फर्स्ट चे सामाजिक कार्यकर्ते आहेत? हे त्यांनी ठरवावे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली

---Advertisement---

याचबरोबर सुनील महाजन असेही म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्यांना राजकारण्यांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो मात्र तो अधिकार राजकारणी असलेल्या डॉ राधेश्याम चौधरी यांना नाही. यामुळे भारतीय जनता पक्षाच मंगळसूत्र त्यांनी पहिले बाहेर काढाव आणि मग सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमच्यावर आरोप करावे असेही सुनील महाजन म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---