डॉ. केतकीताई पाटीलांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट ; दिव्यांग नागरिकांशी साधला संवाद
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । जे कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥२॥ या उक्तीप्रमाणे चोपडा तालुक्यातील वेले आखातवाडे येथील अमर संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील हे समर्पित कार्य करत आहेत. अमर संस्था संचलित, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम गोशाळा तसेच मानव सेवा तीर्थ येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तसेच गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकीताई पाटील यांनी भेट दिली. यावेळी तेथील दिव्यांग नागरिकांशी देखील संवाद साधला.
अमर संस्थेच्या या अनाथ आश्रमात व वृद्धाश्रमात आज 1000 लोक आहेत. तर अमर संस्था संचलित,मानव सेवा तीर्थ येथे 120 बेवारस मनोरुग्णाची ते सेवा करतात. या मनोरुग्णांना तेथे प्रभू संबोधले जाते. यात वृद्धाश्रम, अनाथाश्रम,गोशाळा येथील व्यवस्थापन श्री.शेषराव पाटील तर मानव सेवा तीर्थ येथील व्यवस्थापन श्री.एन.आर.पाटील हे अतिशय समर्पित भावाने करतात. येथील बेवारस मनोरुग्णांना देण्यात येणारी सेवा ही खरंच ईश्वर सेवा आहे. इथे पूर्ण भारतातून आलेल्या, सोडलेल्या बेवारस मनोरुग्णांची सेवा केली जाते. हे सेवा कार्य पाहून मन भरून आले.
अमर संस्था,संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत अण्णा पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या समर्पण भावास, कार्यास सारा समाज नतमस्तक आहे. या भेटी वेळी चोपडा येथील उद्योजक श्री मुरली भाई गुजराती यांची उपस्थिती होती.
इतरांच्या भावना आणि वेदना जिथे समरस होतात तिथे देव विराजमान होतो. अशा देवाचा सहवास अमर संस्थेच्या माध्यमातून आज लाभला.
डॉ केतकी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा