चेट्रीचंड्र उत्सवात सहभागी होऊन डॉ.केतकीताई पाटीलांनी दिल्यात शुभेच्छा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । सिंधी समाजाचे आराध्य श्री संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी भुसावळ येथे निर्मित संत झुलेलाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच सिंधी बांधव, भगिनींशी संवाद साधून चेट्रीचंड्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.
या वेळी सिंधी समाजातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ केतकी ताई पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संत झुलेलाल जयंतीनिमित्त डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी भुसावळ शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू प्रकाशलाल माखीजा, माजी नगरसेवक निकी रमेश बत्रा, समाजसेवक अजय मंधानी, चेट्रीचंड्र उत्सव समिती अध्यक्ष महेश मंचुरिया, रिंकू खेलानी, अजय अटवाणी, केशव गिलानी निखिल नैनानी, झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष नारायणदास छाबडीया, सिरवानी सर आदी उपस्थित होते.