जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी १५०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरांतर्गत फिजिशियन, ऑर्थोपेडिक, सर्जन्स, गायनॅक, इएनटी स्पेशालिस्ट, डोळ्यांचे डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ आणि टू डी इको तपासणीसाठी टेक्निशियन अशी स्वतंत्र टीम गावागावात पोहाेचली होती. यावेळी तिशीवरील स्त्रियांची पॅपस्मीअर तपासणीही मोफत केली. रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी तपासणीचाही रुग्णांना लाभ घेता आला.