डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे.
या अभिवादन सभेस संबोधित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर ललित कोल्हे, जेष्ठ विधीज्ञ ऍड. राजेश झाल्टे, उपायुक्त विद्याताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या अभिवादन सभेत जळगाव शहरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रेल्वे स्टेशन परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर शहरातील विविध भागातील प्रमुख मार्गावर व चौका-चौकात निळे झेंडे लावलेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसह मौलिक व दिशादर्शक विचारांचे बॅनर लावण्यात आलेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित चित्रप्रदर्शन लावण्यात आलेली आहे. सायंकाळी पाच वाजेपासून विविध आंबेडकरी मंडळाच्या मिरवणूका सुभाष चौकातून प्रारंभ होणार असून, गांधी मार्केट, टावर चौक, महापालिका, नेहरू चौक, रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर उत्कृष्ट प्रबोधनात्मक आरास करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंडळाचे स्वागत व सन्मानचिन्ह प्रदान करण्यासाठी मार्गावर स्टेज उभारण्यात आलेले आहे. त्यामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
सायंकाळी मिरवणुकीला कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे.
सदर जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुकूंद सपकाळे, गणेश पगारे, पंकज सोनवणे, सोनू आढाळे , दिलीप सपकाळे, अनिल अडकमोल, अमोल कोल्हे, माजी नगरसेवक राजू मोरे, नगरसेवक सुरेश सोनवणे, संजय सपकाळे, राधे भाऊ शिरसाठ, भारत सोनवणे, मिलिंद सोनवणे, आनंदा तायडे, वाल्मीक सपकाळे, रमेश सोनवणे, नितीन अहिरे, विकी सोनवणे, प्रवीण वाघ आदींसह उत्सव समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे .