डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

फेब्रुवारी 23, 2026 11:37 AM

गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील यांनी केले कौतुक

dr amit rane

जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्यातील प्रसिद्ध रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. अमित राणे यांची जपानमधील टोकियो येथील प्रतिष्ठित ‘जिकेई युनिव्हर्सिटी’ मध्ये ‘WFVS’ फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या फेलोशिपसाठी निवड होणारे ते मोजक्या तज्ज्ञांपैकी एक ठरले आहेत.वर्ल्ड फेडरेशन ऑफ व्हॅस्क्युलर सोसायटीजच्या (WFVS) वतीने ही फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.

Advertisements

जपानमधील प्रसिद्ध तज्ज्ञ प्रो. ओकी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राणे हे रक्तवाहिन्यांशी संबंधित प्रगत शस्त्रक्रिया आणि उपचारांचे प्रशिक्षण घेणार आहेत. ३ ते ६ महिने चालणाऱ्या या फेलोशिपसाठी जिकेई युनिव्हर्सिटीच्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागातील डॉ. हिरोत्सुगु ओझावा यांनी त्यांना अधिकृत निमंत्रण धाडले आहे.

Advertisements

या फेलोशिपमुळे डॉ. राणे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अनुभव मिळणार असून, त्याचा फायदा भविष्यात महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे. या निवडीबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांना भावी कारकीर्दीसाठी सदिच्छा दिल्या आहेत. वैद्यकीय व विविध क्षेत्रातून डॉ. अमित राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now