⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चुकीचे वीजबिल आकारणी करू नका

चुकीचे वीजबिल आकारणी करू नका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथे गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून वीज बिल भरण्यास विरोध नाही मात्र, चुकीचे वीजबिल आकारू नका अशी मागणी शहर भाजप पदाधिकारी व शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक कारण दाखवत डीपी वर्षभर बंद आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चार महिने शेतकऱ्यांना वीज पंप चालविण्याची आवश्यकता भासली नाही. तरीदेखील अव्वाच्या सव्या वीज बिल पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. यासंदर्भात तोडगा काढून शेतकरी व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेऊन तोडगा काढावा तसेच वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोडरे, भाजयुमो अध्यक्ष किरण पाटील, ललित बऱ्हाटे, डॉ.पंकज इंगळे, जितेंद्र महाजन, सचिन महाजन, ऍड.प्रदीप देशपांडे, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, विजय सरोदे, चंद्रकांत पाटील, आत्माराम शिरोळे, हेमंत नेहते, खेमचंद नारखेडे, दीपक सोनवणे, प्रवीण पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह