जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । ‘अरे मी बिलकुल ताण घेत नाही’ असं म्हणणारे कित्येक लोक नेहमीच कोणता ना कोणता ताण घेत असतात. आणि आपण कोणताच ताण घेत नाही असे ते सर्वांना सांगत असल्यामुळे ते आपल्या मनातले कोणालाही सांगू शकत नाही. मुखावर असलेल्या हसल्यामुळे मनातलं नैराश्य ते कधीच कोणाला दाखवू शकत नाहीत. अशावेळी अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे? असा प्रश्न त्यांना पडतो. यासाठी ताण निवारण करण्यासाठी काही सोपे पर्याय आहेत.
अभ्यास, ऑफिसचे काम, कौटुंबिक समस्या, आरोग्याची समस्या यांसारख्या अनेक कारणांमुळे ताण येतो. तणाव हा जीवनाचा एक भाग झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काहीही असो तणावाला आपण बळी पडतोच; पण या तणावामुळे शारीरिक मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजारांचा धोका वाढतो; पण काही साध्या सोप्या उपयांनी तुम्ही तणावापासून दूर राहू शकता.
काय आहेत उपाय ?
बाहेर फिरायला जा – मोकळ्या हवेत काही काळ चालल्याने नकारात्मकता दूर होईल. मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांसोबत पिकनिकला जाऊ शकता.
एक सुगंधी मेणबत्ती लावा – मंद सुवास आणि प्रकाश तुमचा मूड नक्की चांगला करेल.
फुगे फुगवा – काही रंगबिरंगी फुगे फुगवा आणि ते तुमच्या आसपास ठेवा. पाहा तुम्हाला किती छान वाटेल
गाणे गा – तुमच्या आवडीचे गाणे गा
संत्र्याचा ज्युस घ्या – तणाव वाढवणारे कॉर्टिसोल हार्मोन संत्र्याचा ज्युस प्यायल्याने कमी होतात.