जळगाव शहर

बोअरवेलमध्ये पडले कुत्र्याचे पिल्लू, तिसऱ्या प्रयत्नात वाचवला जीव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील गणपतीनगरमधील बंद असलेल्या तारा अपार्टमेंटच्या बोअरवेलमध्ये दीड ते दोन महिन्‍याचे कुत्र्याचे पिल्‍लू पडले. त्यास सुखरूप काढण्यात यश मिळाले.

शहरातील गणपतीनगर मध्ये बंद असलेल्या तारा अपार्टमेंटच्या बोअरवेलमध्ये साधारण दोन महिने वयाचे कुत्र्याचे पिल्लू पडले होते. आतून त्‍या पिल्‍लाचा आवाज येत असल्‍याने नागरिकांनी त्‍यास काढण्याचा प्रयत्‍न केला. दोन वेळा प्रयत्न केला परंतु तो अयशस्‍व झाला. त्यानंतर त्यांनी जळगाव महापालिका अग्निशमन दलाला फोन करत सदर प्रकाराची माहिती दिली.

यावेळी अग्निशमन पथकांने घटनास्थळी जाऊन दोर व हुकच्या सहाय्याने २ वेळा प्रयत्न केला. व तिसऱ्या वेळी त्या पिलाला सुखरूप बाहेर काढले. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रदीप धनगर, प्रकाश चव्हाण, भगवान जाधव, नितीन बारी या कर्मचाऱ्यांनी ही बचाव मोहीम यशस्वी केली.

पहा बचावाचा व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1994047604087691

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button