जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. ही सभा होण्यापूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले. मनसेला भाजपचा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाजन यांना विचारला. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, भाजपचा मनसेला पाठिंबा आहे असे नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचा अजेंडा वेगळा आहे. त्यांची ध्येयधोरणे व विचार सुद्धा वेगळे आहेत. भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे, असे महाजन म्हणाले आहे.
‘भोंग्यावर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा धर्म भेद न करता किंवा त्यावर राजकारण नको. तो एकासाठी आहे तो निर्णय सर्वांसाठी असला पाहिजे, सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आहे तर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकप्रकारे राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
तसंच, भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे यावर दुमत नाही असे म्हणत गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे तर दुसरीकडे मात्र मनसेला भाजपचा पाठिंबा नसल्याचेही स्पष्ट केलंय.
भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे. मात्र यावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा धर्म भेद न करता कामा नये. किंवा त्यावर राजकारण करता कामा नये. तो निर्णय सर्वांसाठी असला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आहे तर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.