---Advertisement---
जळगाव जिल्हा

आ.गिरीश महाजनांचे डॉक्टरांनी केले स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ एप्रिल २०२२ । राज्यातील पहिले मेडीकल हब तत्कालीन वैद्यकीय मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून उभारनार असल्याने होमिओपॅथी डॉक्टरांतर्फे आज त्यांचे स्वागत करण्यात आले.

आ गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यात राज्यातील पहिले मेडिकल हब चिंचोली शिवारात उभारण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक पदवीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जामनेरसह जळगाव जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. याप्रसंगी डॉ. रितेश पाटील(जळगाव), चामुंडा माता होमिओपॅथी महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ. समीर साठे, डॉ. मनोज विसपुते, डॉ. देवानंद कुलकर्णी, जामनेर तालुका अध्यक्ष डॉ. योगेश इंगळे, डॉ. विश्वनाथ शेळके, डॉ. रुपेश पाटील, डॉ. नंदकिशोर कोल्हे (यावल), डॉ. पंकज चौधरी (चोपडा), डॉ. महेश वाणी (चाळीसगाव), डॉ. नवीन महाजन (एरंडोल), डॉ. विकास कळसकर (भुसावळ), डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्यासह जिल्हातील सर्व तालुक्यातील होमिओपॅथी डॉक्टर सहभागी झाले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---