कर नाहीतर डर कशाला ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राउतांना टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता प्रसार माध्यमांसमोर येऊन ‘मी कोणालाही घाबरत नाही. मी ईडी चौकशी समोर हजर व्हायला तयार आहे’ असं नेहमी म्हणायचे. आणि आज नेमकी त्यांची तीच चौकशी सुरू आहे. यामुळे जर संजय राऊतांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना कसलीही भीती वाटू नये. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राउतांवर झालेल्या ईडी कारवाईबाबत दिली.
यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत हे कोणालाही घाबरत नाहीत. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. असे ते नेहमी म्हणत होते. प्रसार माध्यमांसमोर रोज सकाळी नऊ वाजता येऊन ते अशी घोषणा करत होते. त्यामुळे जर कर नाही तर डर कशाला? त्यांच्यावर कोणतीही कारवाई अजून झाली नाहीये. त्यांची फक्त चौकशी सुरू आहे. याच बरोबर शिंदे पुढे असेही म्हणाले की, ज्यांना ज्यांना ईडीची भीती वाटत असेल त्यांनी भारतीय जनता पक्षात किंबहुना शिवसेनेत येऊ नये. भारतीय जनता पक्षामध्ये किंवा शिवसेनेत येण्यासाठी कोणावरही कारवाई केली जात नाहीये.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रविवारी पहाटे ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या घरी धाड टाकली आहे. गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. गेल्या ३ तासापासून राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. काही कागदपत्रं तपासण्यात येत आहेत. तसेच राऊतांची चौकशीही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही कारवाई बराच वेळ चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राऊत यांची चांगलीच अडचण झाली आहे.