---Advertisement---
धरणगाव

ई पीक पाहणी साठी जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । धरणगाव प्रतिनिधी – महसूल विभाग राबवित असलेल्या ई पीक पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे थेट धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या बांधावर पोहुचन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल विभागाने   शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी ई पीक पाहणी कार्यक्रम  राबवीत आहे याद्वारे शेतकऱ्याच्या शेतातील पीक क्षेत्रातील पीक तेच उताऱ्यावर अपेक्षित आहे तर गेल्या तीन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले असुन लवकारत लवकर पोहचविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

dm abhijeet raut reached till rural farms

यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी अधिकारी राऊत म्हणाले की ई पीक पाहणी कार्यक्रम असं अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम महसूल विभाग राबवीत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभाग  चांगली कामगिरी करीत आहे. यासाठी तलाठी कोतवाल मंडल अधिकारी चांगली कामगिरी करीत आहे तसेच शेतकऱ्यांमध्ये चांगल्याप्रकारे जनजागृती केल्यामुळे व त्यांच्यावर असलेल्या परिवेक्षक यांमुळे जिल्ह्यात 33 टक्के खातेदारांची नोंदणी केली आहे . जिल्ह्यातील आठ लाखाहून जास्त खातेदारांनी नोंदणी झाली आहे राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहेत ई पीक नोंदणीसाठी तीस तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे शेतकऱ्यांनी तंत्र समजून घेतल्यास भविष्यात शासन जे उपक्रम राबविले त्यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येईल याचा फायदा शेतकऱ्यांना होईल
या ई पीक नोंदणीचा फायदा शेतकऱ्यांना होईल जी परिस्थिती क्षेत्रात किंवा शेतात आहे तीच उतार असणे  अपेक्षित आहे.

---Advertisement---

तर गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी ची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या ठिकाणी जाऊन तात्काळ पंचनामे करण्यात येत आहे हे सर्व अहवाल शासनाला पाठवण्यात आले आहे शेतकऱ्यांना या वेळी जिल्हाधिकारी यांनी आव्हान केले की शेतकऱ्यांसाठी हे अडचणीचे प्रसंग असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी व मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे नियोजन करू असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ई पीक साठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक या गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते यावेळी त्यांनी ई पीक पाहणी करून शेतकऱ्यांची इ पीक नोंदणी बाकी होती ती करून घेतली.यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत याचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रांत विनायक गोसावी,तहसीलदार नितींकुमार देवरे ,तलाठी आरिफ शेख मंडलाधिकारी बाविस्कर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---