जळगाव जिल्हाराजकारण
राज्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा
जळगाव लाईव्ह न्युज । ९ एप्रिल २०२२ । केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार, या दोन दिवस शनिवार, रविवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
ना.डॉ.पवार या शनिवारी सायंकाळी औरंगाबाद येथून जळगाव येथे आगमन करतील रात्री जळगाव येथे मुक्काम तर रविवार सकाळी १० रोजी जळगाव येथे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन, स्थानिक कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नांदगाव येथील कार्यक्रमासाठी वाहनाने रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.