⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | जिल्हा पोलीस डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते ग्रामरक्षकांना साहित्य वाटप

जिल्हा पोलीस डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते ग्रामरक्षकांना साहित्य वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । पाचोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित वार्षिक अहवाल तपासणी निमित्ताने ग्रामरक्षक दलाची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठकपार पडली. यावेळी डॉ. मुंडे यांच्या हस्ते ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना लाठी, सिटी व टी-शर्ट वाटप करण्यात आले.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी अधिकाधिक पोलिसांना मदत करून सहकार्य करावे, व कुठलीही संकल्पना जर यशस्वी करायची असेल तर काम करण्याची जिद्द मनापासून ठेवावी लागते आपण ग्रामरक्षक दलाचे सदस्य झाले. याबाबत आपले अभिनंदन करतो कि पोलिसांना मदत करण्याचे हेतूने आपण कार्यकरणार अशी अपेक्षा बाळगतो.

पाचोरा तालुक्यातील पुनगाव आणि खडकदेवळा या दोन्ही गावातील ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी अतिशय उत्तम काम करत पोलिसांना सहकार्य करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबाबत देखील मुंडे यांनी सदर ग्राम रक्षक दलाच्या सदस्यांचा सन्मान केला व कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर ठेवली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मदतीला ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व सामान्य नागरिक हे नेहमी पोलिसांचे कान, नाक, डोळे, हात म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून गावातील सुरक्षेचे काम आपण करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या देखील थांबतील व यावर अंकुश बसेल असे मला वाटते.

यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौभे पाचोरा तालुक्यातील पोलिस पाटील व ग्राम रक्षक दलाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी.एन. चौधरी व आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी शिंदे यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह