जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हास्तरीय कराटे व स्केटिंग स्पर्धा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । जिल्हा पोलिस दल व जिल्हा वेल्फेअर फाउंडेशन जळगाव संचालित पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त खुल्या निशुल्क जिल्हास्तरीय कराटे व स्केटिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण दोनशे हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत सुवर्णपदक, रजतपदक व कांस्यपदक पटकावले. साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, डेप्युटी कमिशनर ( जीएसटी ) सोपान सोलंखी, अमित माळी यांच्या हस्ते खेळाडूंना पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रवीण मुंढें पोलीस अधीक्षक जळगाव,चंद्रकांत गवळी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित पोलीस उप अधीक्षक( गृह ) तसेच पोलीस वेल्फेअरचे उप पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील व कर्मचारी वृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या यशामागे पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/ जंजाळे, पोलीस स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे/महाजन, सहाय्यक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, प्राजक्ता सोनवणे, तुषार टाक, मयूर शिरसाठ, स्वीटी गायकवाड, दीपक शिरसाट सूर्यकांत अहिरे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.