⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | 10वी पास उमेदवारांना जिल्हा न्यायालयात नोकरीची संधी, पगार 57,000 पर्यंत मिळेल

10वी पास उमेदवारांना जिल्हा न्यायालयात नोकरीची संधी, पगार 57,000 पर्यंत मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । 10वी पास उमेदवारांसाठी जिल्हा न्यायलय अकोला येथे भरती निघाली आहे. पुस्तक बांधणीकार या पदांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (District Court Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.

एकूण जागा 04

पदाचे नाव : पुस्तक बांधणीकार (Book binder) –

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी बुक बायंडर या ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 21 ते 38 वर्षे,मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 21 ते 43 वर्षे

किती मिळेल पगार
पुस्तक बांधणीकार (Book binder) – 18,000/- ते 56,900/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.