जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । सावदा शहरात दोन सत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यावेळी १२ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारून येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.दरम्यान,जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असता.लसीकरण मोहीम पाहून समाधान व्यक्त केले.
दरम्यान,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोवीड़ लसीकरण केंद्राला भेट देऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या.यावेळी सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, सावदा वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपिका ओक,डॉ.निलोफर,एन.एम.भंगाळे सिस्टर,नगरपालिका अधिकारी अहुजा महेश चौधरी,जितेश पाटील,अरुण ठोसरे,डॉ.वसीम खान आदी उपस्थित होते,दरम्यान,जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहीम पाहून समाधान व्यक्त केले.व 100% लसीकरण पूर्ण बाबत सूचना केल्या.