⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पाणीपुरवठा योजनेचे सरपंचाना मान्यता पत्र वाटप!

पाणीपुरवठा योजनेचे सरपंचाना मान्यता पत्र वाटप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांना आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने यातील 15 गावांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र संबधीत गावाच्या सरपंचाना जळगाव येथे वाटप करण्यात आले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या प्रशासकीय मान्यता वितरित करण्यात आल्या. अमळनेर मतदारसंघातील अंबारे- खापरखेडा, कोंढावळ, हिंगोणे बु, ढेकु सिम, रुंधाटी, नांदगाव, वाघोदे, कावपिंप्री, लोण सिम, लोण खुर्द, सोनखेडी, दापोरी बु, लोण चारम, झाडी, शेवगे बु व दळवेल इत्यादी गावांच्या उपस्थित सरपंच व इतर पदाधिकारी यांना हे मान्यता पत्र देण्यात आले. यावेळी सर्वांनी पालकमंत्री व आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा – आ.अनिल पाटील

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक तुटवडा असताना देखील जीवन प्राधिकरण व येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी मोठा निधी मिळवला, म्हणूनच मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांना निधी मिळाला आहे. यापूर्वी कधीतरी कामे मंजूर होऊन सरपंचाना याचा पत्ताही राहत नव्हता, थेट एजन्सी गावात काम करण्यासाठी आल्यानंतर गावाला योजनेची माहिती होत होती. पण भाऊंनी एक वेगळा पायंडा पाडत एकाच वेळी अनेक सरपंचाच्या हातीच प्रशासकीय मान्यता ठेवल्याने हा दिवस नक्कीच सुवर्ण अक्षरांनी ठेवण्यासारखा आहे. लवकरच या गावांची टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामही सुरू होणार आहे. पुढील टप्प्यात इतर प्रस्तावित गावांना देखील याच पद्धतीने प्रशासकीय मान्यता दिल्या जातील अशी ग्वाही देत सदर योजनांच्या मंजुरीबद्दल मतदारसंघाच्या वतीने आमदारांनी पालकमंत्र्याचे विशेष आभार व्यक्त केले. तर पालकमंत्रीनी देखील आमदारांना आपल्या मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांबद्दल असलेल्या कळकळीचे कौतुक केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह